पनवेल: महापालिका स्थापन झाल्यापासून सहा वर्षे उलटली, तरी पालिका आस्थापनेवर भरती प्रक्रीया झाली नव्हती. अखेर पनवेल पालिका प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी जाहीरात प्रसिद्ध करुन गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील रिक्त ३७७ पदांसाठी सरळ सेवेमार्फत थेट भरतीची प्रक्रिया जाहीर केली. १३ जूलै ते १७ ऑगस्ट या दरम्यान उमेदवारांना त्यांचे अर्ज भरता येणार आहेत. या नोकर भरतीकडे अनेक वर्षांपासून सुशिक्षित तरुणांचे लक्ष्य लागले होते.

या भरती प्रकियेतप्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सूरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकीसेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निम वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परिक्षण सेवा इत्यादी विभागातील पदांकरीता भरती होणार आहे. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रीया होण्यासाठी ही जाहीरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना http://www.panvelcorporation.com, https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर १७ ऑगस्टपर्यंत रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परिक्षेचे ठिकाण आणि वेळ इमेल व एसएमएस व्दारे कळविण्यात येणार आहे. निवड प्रक्रीयेत मौखिक परिक्षा घेतली जाणार नाही. मात्र निवडसूचीतील उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी (केवायसी व्हेरीफीकेशन) मुलाखत घेतली जाईल. संबंधित मुलाखतीसाठी कोणतेही प्रकारचे गुण दिले जाणार नाहीत.

city will be board free within 72 hours after implementation of the code of conduct
नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकमुक्त
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Dnyanradha Multistate Society, 1000 crores frozen,
ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या कार्यालयांवर ईडीचे छापे; मालमत्ता, रोख मिळून १ हजार कोटी गोठवले
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
zoom phone launched in india service to begin in pune
झूम फोन सेवेला पुण्यातून सुरुवात
Narendra Modi pune, Ganesh Kala Krida Rangmanch,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची शक्यता, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू
Mumbai University senate Elections,
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : नवीन तारीख मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ, प्रचाराची रणधुमाळी शिगेला
Mumbai University senate Election, Mumbai University,
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : ‘अभाविप’चे फोर्ट संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन