लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मेअखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जुन्नर आंबा हंगामाला सुरुवात होते. बाजारात सध्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. प्रतिडझन जुन्नर आंब्याला ५०० ते ९०० रुपये दर आहे. मात्र यंदा हंगामाला उशिराने सुरुवात होत आहे.

पावसाळी फळांच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारात आता केशर, नीलम, तोतापुरी, राजापुरी, बलसाड या जातीचे आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मेअखेरीस बाजारात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र सध्या बाजारात कमी प्रमाणात जुन्नर हापूस दाखल होत असून जूनमध्ये आवक वाढेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंतापदी कुणाची निवड?

अवकाळी पावसामुळे यंदा छाटणी उशिराने झाली. त्यामुळे बाजारात जुन्नर आंबे दाखल होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. जून १० नंतर बाजारात जुन्नर हापूस वाढणार आहे. सध्या बाजारात जुन्नर हापूसच्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. जुन्नर हापूस प्रतिडझन ५००-९०० रुपयांनी विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junnar hapus season at apmc mrj
Show comments