कामोठे येथे साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाने तब्बल तीन लाख रुपये किमतीचा गुटखा व दोन मारुती गाडय़ा गुरुवारी जप्त केल्या. कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून हा गुटखा येथे आणून नवी मुंबई व मुंबईत तो पुरवला जातो, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे सहा वाजता गुटखा वाहून नेणाऱ्या या वाहनांना कामोठे येथे ताब्यात घेण्यात आले. या गाडय़ांच्या डिकीमध्ये गुटखा आढळून आला. या वेळी गुटख्याच्या १५ गोण्या जप्त करण्यात आल्या. पथकाने अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा