उरण : मुंबईतील ससून बंदरावरील ताण कमी करण्यासाठी उरणच्या करंजा येथे नवे मच्छिमार बंदर उभारले जात असून कंत्राटदाराने ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने २१४ दिवसांच्या दिरंगाचे दर दिवसाचे १ लाख ५५ हजार ५५६ नुसार ३ कोटी ३२ लाख ८८ हजार ९८४ रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच बंदराचे काम येत्या मार्च अखेर पर्यंत पूर्ण करून बोर्डाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उरणसह रायगड मधील मच्छिमारांसाठी महत्वाचे असलेले करंजा बंदर लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई एमआयडीसीतील महापे परिसरात ‘पाणीबाणी’ कायम; एक वर्षापासून अनियमित पाणीपुरवठा

minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

स्वातंत्र्य पूर्व काळात मुंबईत उभारण्यात आलेले ससून डॉक हे मच्छिमार बंदर राज्यातील मच्छिमारांचा व्यवहार करण्यासाठीचे बंदर अपुरे पडत असल्याने तसेच रायगड मधील मच्छिमारांना मासेविक्रीसाठी उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारण्यात येत आहे. या बंदरासाठी सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या समान भागीदारीतून हे बंदर उभारले जात आहे. ७५ कोटी वरून  १५० कोटीवर या बंदराचा खर्च पोहचला आहे. मात्र या बंदराच्या कामकाजात सुरुवाती पासूनच दिरंगाई व बंदराच्या कामातील निकृष्ट दर्जाच्या तक्रारी येथील मच्छिमार व त्यांच्या संस्थांनी मेरिटाइम बोर्डाकडे केल्या आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात नवीन बटाटा हंगामाने दर घसरण

यामध्ये बंदराच्या भरावात चिखल मातीचा भराव केला जात असल्याची तसेच कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे फिशरमन काँग्रेसचे कोकण विभागीय अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केली होती. त्याची चौकशी करण्याचे आश्वासन बोर्डाने दिले होते त्याची अंमलबजावणी केली असल्याचे मत नाखवा यांनी व्यक्त केलं आहे.  करंजा बंदराचे काम विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने कंत्राटदाराला दंड केला आहे. तो त्यांच्या कडून वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे मार्च अखेर पर्यंत बंदराचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी दिली आहे. २ फेब्रुवारीला बोर्डाने पत्र देऊन कंत्राटदाराला दंड आकारण्याची माहिती दिली आहे. यामध्ये करोना काळात सूट दिल्या नंतर ही कामाचा दर्जा व काम पूर्ण करण्यासाठी सूचना देऊनही काम वेळेत झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पर्यंत बंदराचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित १५ टक्के काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

Story img Loader