नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात असलेल्या मूळ गावठाणांच्या परिसरात करावे गाव येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ही स्मशानभूमी धोकादायक स्थितीत असून त्याची तात्काळ सुधारण करण्याची मागणी नवी मुंबईतील उबाठा गटाचे पदाधिकारी सुमित्र कडू तसेच उपशहरप्रमुख समीर बागवान विविध पदाधिकारी यांनी सोमवारी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
नवी मुंबई शहरात असलेल्या मूळ गावठाणालगत स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींचा मूळ स्थानिक ग्रामस्थासमवेत शहरी नोडमधील नागरिकांनाही या स्मशानभूमींची सुविधा उपलब्ध होते. करावे येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्याच्या ठिकाणी असणाऱ्या असलेला लोखंडी साच्याची दुरवस्था झाली आहे. त्याच्या शेजारी सिमेंटचे स्ट्रक्चरचे खांब जीर्ण झाले आहेत. त्यामुळे अंतिम संस्काराच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. या स्मशानभूमीत पर्यावरणपूरक सुविधा करण्यात आली असून विद्युतदाहिनीचीही सोय आहे. परंतु आतापर्यंत या विद्युतदाहिनीच्या मदतीने किती अंत्यसंस्कार करण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. आधी लावलेला जनरेटर गंजून खराब झाला असून त्या ठिकाणी नवीन जनरेटर लावला असून त्यासाठी शेडची व्यवस्था न केल्यामुळे पहिल्या जनरेटरप्रमाणेच दुसरा जनरेटरही गंजून जाण्याची शक्यता आहे.
अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणीही पालिका सुव्यवस्थितपणे सुविधा देत नाही. पालिका आयुक्तांनी करावे स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
सुमित्र कडू ,उपजिल्हाप्रमुख उबाठा, नवी मुंबई</p>