पनवेल : नवी मुंबई पोलिस दलातील खांदेश्वर पोलीसांनी यंदा सामाजिक संदेश देत अनाथ आश्रमातील मुले आणि तृतीयपंथी यांच्यासोबत नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. खांदेश्वर वसाहतीमधील बाल ग्राम आश्रमातील मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथी यांच्या सोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांच्यासह पोलीस पथकाने आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुके रंग लावून रंगपंचमी साजरी केली. यावेळी आश्रमातील मुलांनी गाणं गाऊन, नृत्य सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगपंचमीमध्ये रंगांची उधळण करत प्रत्येक जण आपल्या परिवारासोबत मित्र मैत्रीणींसोबत सणाचा आनंद लुटतात. अनाथ आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीयपंथीयांना सुद्धा रंगांची उधळण करता यावी यासाठी पोलीसांनी राबविलेला हा उपक्रम होता. बालग्राम आश्रमात ४४ मुले व मुली आहेत. पोलिसांनी या आश्रमात मुलांना खाऊ वाटले. परिसरातील सामाजिक संस्थांनी अनेक आश्रमांमधील मुलांसोबत सण साजरे करावे असे आवाहन पोलीस अधिकारी लांडगे यांनी केले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीस ही अनोखी रंगपंचमी साजरे करु शकले असे मत पोलीस अधिकारी लांडगे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा…मोदी सरकार अन् कमळाचे चिन्ह यांची विना परवाना जाहीरात करणाऱ्यांविरोधात कामोठेत गुन्हा दाखल

सामान्य व्यक्ती आणि तृतीयपंथी यांच्यामधील सामाजिक भेदभाव मिटविण्यासाठी पोलीस विभागाने घेतलेला पुढाकाराचे खरेच कौतुक आहे. ऐरवी होळी व रंगपंचमीमध्ये आमच्याकडे कोणीही ढुंकून पाहत नाहीत. मात्र आम्ही तुमच्यातील एक आहोत हा संदेश देण्यासाठी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत लांडगे व त्यांचे पोलिसांनी आमच्यासोबत रंगपंचमी साजरी करुन आमचे दक्ष हे आमचा किती विचार करतात याचे प्रतिक दर्शवून दिले आहे. -मानसी लक्ष्मी, तृतीयपंथी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshwar police celebrates rangpanchami in navi mumbai with orphanage children and transgenders psg
Show comments