नवी मुंबई : खारघर पोलिसांनी दोन आरोपींना देशी कट्टा बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. हा कट्टा अर्थात देशी पिस्तुल कोणासाठी आणले या बाबत चौकशी सुरू आहे.सुमारे १५ हजार किमतीचे पिस्टल एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. खारघर पोलीस ठाणे हद्दीत ६ तारखेला सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेक्टर १२ खारघर या ठिकाणी संशयित दोन व्यक्तींना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.सागर जानू ढेबे वय- २३ आणि राहुल विश्वनाथ गायकवाड वय -२४ अशी त्यांची नावे आहेत. त्यांची अंगझडतील त्यांच्याकडे बेकायदेशीररित्या एक पिस्तूल (देशी कटटा) मिळून आला. या आरोपींना बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. त्यांनी हे शस्त्र स्वतः साठी आणले की विकण्यास आणले या बाबत चौकशी सुरू आहे अशी माहिती खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजीव शेजवळ यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा