नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या परिवहन विभागाने नियोजित केलेल्या खारघर ते तूर्भे या लिंकरोडचे काम नूकतेच खारघर येथून सूरु केले परंतू ज्या ठिकाणी काम सूरु झाले त्या लगतच्या सेक्टर ३५ येथील मोकळ्या मैदानावर १४ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होणार असल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. ही प्रचारसभा झाल्यानंतरच हे काम सूरु होईल असे नाव न सांगीतले जात आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे खारघर, उलवे, द्रोणागिरी, नवी मुंबईतील विविध उपनगरांतील दळणवळणाचे जाळे आणखी मजबूत करण्याचे सिडको मंडळाचे नियोजन आहे.खारघर तूर्भे लिंकरोड हा याच दळणवळणातील एक मुख्य प्रकल्प आहे.

हेही वाचा >>> उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
youth crowd at mankoli bridge to burst crackers
डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा; फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी

सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे काम सूरु आहे. या प्रकल्पाला वन आणि पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्याने हे काम सिडको मंडळाने सूरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार कंपनीला दिले आहेत. या प्रकल्पामुळे अवघ्या काही मिनिटांत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील आणि पनवेलच्या इतर वाहनांना थेट तूर्भे मार्गे नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्योगिक वसाहत येथे जाता येणार आहे. ५.४९ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगराखालील १.७६ किमीच्या बोगदा खणने तसेच उड्डाणपुल बांधणे ही मुख्य दोन कामे या प्रकल्पात आहेत. 

हेही वाचा >>> बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !

सध्या मुंबईहून खारघर उपनगरात येणा-या वाहनचालकांना शीव पनवेल महामार्ग तसेच पामबीच मार्गेच यावे लागते. हा मार्ग झाल्यानंतर तूर्भे येथून थेट खारघर आणि अप्पर खारघरमध्ये काही मिनिटात पोहचता येईल. खारघर उपनगरातील हा मार्ग बनण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागणार आहे. जेथे हा मार्ग खारघरमधून सूरु होतो तेथील सेक्टर ३५ येथे उन्नत मार्ग उभारुन सिडको मंडळाने सूमारे शंभर एकर जागेवर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क उभारणाराला हा मार्ग जोडणार आहे. त्यामुळे या कार्पोरेट पार्कमधून थेट तूर्भे मार्गे मुंबईकडे काही मिनिटांत जाता येईल. सध्या शीव पनवेल महामार्गावरुन खारघर उपनगरात येजा करण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. खारघर तूर्भे लिंकरोड मार्ग वाहतूकीसाठी खुला झाल्यावर शीव पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. सिडको मंडळ या प्रकल्पासाठी सूमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.