जगदीश तांडेल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : मंगळवारी बेलापूर ते खारकोपर मार्गावरील ८.४६ वाजताच्या रेल्वेचे डबे घसरल्याने अपघात झाला आहे. या रेल्वेचे रूळ पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच तास लागणार असल्याची माहीती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत खारकोपर ते नेरुळ व बेलापूर या मार्गावरील लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले, सुदैवाने कोणीही जखमी नाही

हेही वाचा… उरण: बोकडविरा येथील गवताला आग; महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांना धोका

मंगळवारी सकाळी बेलापूर वरून सुटलेली लोकल उलवे नोड मधील बामण डोंगरी स्थानकावरून पुढे खारकोपर स्थानकात येत असताना काही अंतरावर असतांनाच इंजिन सह दोन डबे रुळावरून घसरले आणि अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी रेल्वे कडून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून हे काम पूर्ण होऊन या मार्गावरील रेल्वे पूर्ववत होण्यासाठी चार तास लागणार असल्याची माहीती. त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या अपघाताचे कारण स्पष्ट नसल्याचीही माहीती दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharkopar nerul belapur local services will be restore after five hours only asj