जगदीश तांडेल उरण : मंगळवारी सकाळी ८.४६ ची बेलापूर ते खारकोपर रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असतांनाच डबे घसरल्याने अपघात झाला आहे.सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही. मात्र त्यामुळे खारकोपर – नेरुळ ते बेलापूर या लोकलचा मार्ग मागील दहा तासापासून बंद आहे. या अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.तर दुरुतीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तविली आहे. 

मंगळवारी सकाळी बेलापूर वरून  सुटलेली लोकल उलवे नोड मधील बामण डोंगरी स्थानकावरून पुढे खारकोपर स्थानकात येत असताना काही अंतरावर असतांनाच इंजिन सह दोन डबे रुळावरून घसरले आणि  अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी.डी.पाटील यांनी रेल्वे कडून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून हे काम पूर्ण होऊन या मार्गावरील रेल्वे पूर्ववत करण्याचे काम सुरू असून दोन डबे रुळावर चढविण्यात आले असल्याची माहीती. त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या अपघाताचे कारण स्पष्ट नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र