नवी मुंबई : खोपटे येथे अपघातात बस चालकांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ एन.एम.एम.टी. श्रमिक सेनेने आज काही काळ काम बंद आंदोलन केले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

अपघाताच्या घटनेनंतर खोपटे येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून चालकाला मारहाण करत घटनास्थळी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल सात ते आठ तास ओलीस धरले होते. एनएमएमटीच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याने कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलनाची हाक दिली होती.

pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा – नवी मुंबईत तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ३७७ घटना, ४० महिलांच्या आत्महत्या

सकाळी सात वाजता शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याचे दिसून आले. कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद करण्याची नोटीस देऊनही प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रसंगी पोलीस बंदोबस्तामध्ये बस सेवा सुरळीत चालू राहील याकरिता कोणत्याही प्रकारे आगाऊ पोलीस बंदोबस्त मागवला नव्हता. त्यामुळे या बंदला प्रशासनाचीच फूस होती की काय अशीही चर्चा रंगली आहे.

जुईनगर-कोप्रोली मार्गावरील एनएमएमटी बस बंद

गुरुवारी खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईतील जुईनगर रेल्वेस्थानक ते उरणच्या कोप्रोली गावदरम्यानची या मार्गावरील एनएमएमटीची ३४ क्रमांकाची बस सेवा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. अपघाताच्या घटनेनंतर एनएमएमटीच्या कामगारांनी या मार्गावर काम करण्यास नकार दिला आहे.

या मार्गावर दिवसभर ५२ फेऱ्या आणि ५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. खोपटे येथे गुरुवारी एनएमएमटीच्या बसला भीषण अपघात झाला. यामध्ये एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होत सकाळी १० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा मार्ग रोखून धरला होता. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर कर्मचाऱ्यांनी जुईनगर ते कोप्रोली मार्गावर काम करण्यास नकार दिल्याने बस सेवा बंद करण्यात आली असून ती कधी सुरू होईल ते सांगता येणार नसल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली.

हेही वाचा – लोकलने धडक देऊनही दैव बलवत्तर म्हणून वाचला; वाशी स्टेशन मधील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद 

तीन तालुक्यांना जोडणारा मार्ग

एनएमएमटीचा जुईनगर ते कोप्रोली हा मार्ग रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण या तीन तालुक्यांना जोडणारा बस मार्ग आहे. त्यामुळे या तालुक्यातील चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी उरण ते मुंबई या मार्गावर थेट प्रवास करण्याची सोय झाली आहे. उरण लोकल सुरू झाली असली तरी हा मार्ग बंदरावर आधारित उद्योग-व्यवसायानिमित्ताने मुंबईहून उरणच्या गोदामात येणाऱ्यांसाठीही महत्त्वाचा ठरत आहे.