रबाळे आद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या एका मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केला. मुलीने भेदरून खूप आरडा ओरडा सुरू केल्याने आरोपींनी तिला तिच्या घराच्या परिसरात सोडून पळ काढला. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
२५ जानेवारीला आठ सव्वाआठच्या सुमारास श्री. अष्टविनायक को ऑप. सोसा. सावित्रीबाई ठाकूर मार्ग, मुकुंद कंपनीजवळ, ईश्वरनगर, दिघा नवी मुंबई या ठिकाणी फिर्यादी यांच्या अल्पवयीन (मतिमंद) मुलीस कोणीतरी अनोळखी इसमाने फुस लावून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मतीमंद मुलीने आरडा ओरड केल्यामुळे अनोळखी आरोपीने तिला पुन्हा तिच्या राहत्या परिसराजवळ आणून तेथून निघून गेले. या प्रकरणी २६ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश चनई पासी (वय ४१ वर्षे, रा. सिमजी विश्राम बैठी चाळ, शिवडी, मुंबई) व त्याचा साथीदार संतोष चनई पासी (वय ४६ वर्षे, रा. रूम नं. ३. श्री अष्टविनायक चाळ, ईश्वरनगर, दिघा नवी मुंबई) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील आरोपींनी तपासादरम्यान कबुली दिली असून त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, परि १. वाशी, सहायक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे, वाशी विभाग सुधीर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, दिपक शेळके आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण, उल्लेखनिय कामगिरी करून २४ तासांच्या आत अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.