पनवेल : कोकण पदवीधर मतदारसंघाची बुधवारी निवडणूक पार पडत असून पनवेलमध्ये सकाळच्या सत्रात पदवीधर मतदार उत्साहात मतदान करताना दिसले. सर्वच पनवेल तालुक्यातील पदवीधरांना मतदानासाठी नवीन पनवेलमधील चार विविध मतदान केंद्रांवर यावे लागले. यामध्ये पोस्ट कार्यालयाशेजारील संत साईबाबा शाळा, पोदी येथील सेक्टर १५ ए येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा, सेक्टर १४ येथील सीकेटी विद्यालय, बांठिया हायस्कूल या मतदान केंद्रांवर मतदार मतदान करत होते.

हेही वाचा – झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

हेही वाचा – घोडबंदरमध्ये भरवस्तीत सिमेंट काँक्रीट प्रकल्प, हावरे सिटी संकुलासह परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

कोकण पदवीधर मतदारसंघात २ लाख २३ हजार २२५ मतदार असून रायगड जिल्ह्यात ५४ हजार १९९ मतदार आहेत, त्यापैकी पनवेलमध्ये २०,०७१ मतदार आहेत. बुधवारी सकाळी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी किशन जावळे हे मतदान प्रक्रियेवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेऊन होते.