वेगाने वाढणाऱ्या शहरात नवी मुंबई महापालिका उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु कोपरखैरणे हा विभाग महापालिकेच्या आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे. येथील महापालिकेचे माता बाल रुग्णालय गेल्या ७ वर्षांपासून बंद आहे. कोपरखैरणे परिसरातील नागरी आरोग्य केंद्रावर रुग्णांचा भार पडत आहे. किमान ५० हजार लोकसंख्येच्या घनतेनुसार एक नागरी आरोग्य केंद्र असणे आवश्यक असून आजमितीला कोपरखैरणे विभागाची लोकसंख्या अडीच ते तीन लाखाच्या घरात गेली आहे. मात्र, याठिकाणी केवळ एकच आरोग्य केंद्र असून नागरी आरोग्याचा बोजवारा उडत आहे.
हेही वाचा- चित्रीकरण करणे पडलं महागात; थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल, वाचा नेमके काय झाले…
नवी मुंबई शहरासाठी ८ विभागात एकुण २३ नागरी आरोग्य केंद्र आहेत. पंरतु शहरातील सर्वात हसत लोकसंख्या अलसलेल्या कोपरखैरणे परिसरात महापालिकेचे केवळ एकच नागरीसुविधा केंद्र उपलब्ध आहे. येथील नागरिकांना बोनकोडे से. १२ येथील नागरी सुविधा केंद्रात जावे लागते. नाहीतर खाजगी पर्यायाकडे धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालय देखील याचा फायदा घेऊन गरीब-गरजू नागरिकांकडून बक्कळ रुपये उकळतात. कोपरखैरणे सेक्टर २३ येथे महापालिकेचे माता बाल रुग्णालय होते, परंतु ते मागील ७ वर्षापासून बंद आहे. येथील अनेक गरोदर महिलांना ७ते ८ किमी अंतरावरील ऐरोली आणि ४ किमी अंतरावरील पायपीट करून वाशी महापालिका रुग्णालय गाठावे लागते.
हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत पावसामुळे कांदे भिजले ; ऐनवेळी पावसाचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट
प्रसंगी खासगी रुग्णालयाचा आधारही घ्यावा लागत आहे. कोपरखैरणे येथील नागरी आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. या नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार, गरोदर मातांना मार्गदर्शन केले जाते. घरो-घरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाते. त्यांना डोस दिले जातात. त्या व्यतिरिक्त केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णाचे केस पेपर पासून ते त्यांना औषधे देणे हि कामे केली जातात. ही परिचारिका कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त लोकसंख्येचा भाग पडत आहे त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रावर ताण वाढत असून येथील नागरिक महापालिका सुविधांपासून वंचित राहत आहेत.
लोकसंख्येनुसार शहराला ३० आरोग्य केंद्राची आवश्यकता मात्र सद्यस्थितीत २३ सेवेत
नवी मुंबई शहराची लोकसंख्या अंदाजित १५ लाखाहून अधिक आहे. किमान ५० हजार लोकसंख्येला १ नागरी आरोग्य केंद्र नवी मुंबई शहराला नियमांनुसार ३० केंद्राची आवश्यकता, मात्र सद्यस्थितीत २३ आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेत आहेत. त्यात नव्याने १४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश झाला असून तेथील नारळ नागरी आरोग्य केंद्राचा उभारण्याचीही आवाहन महापालिकेसमोर आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : अग्निशमन विभागामार्फत नागरिकांना आपत्ती सुरक्षिततेचे धडे
प्रत्येक विभागात नवी मुंबई महापालिकेत आरोग्य विभागाच्या वतीने हेल्थ वेलनेस क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक उपचार, रक्त तपासणी सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मत नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.