नवी मुंबई : कोपरखैरणे  पोलिसांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणात तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. कोपरखैरणे घणसोली परिसरात पाणी मीटर चोरी करून पाणी ग्राहकांना हैराण करणाऱ्या आरोपीचाही यात समावेश आहे. 

शाहीद अर्शद शेख, सरूद्दीन ताजुद्दीन शेख आणि प्रमोद मोहन कुमार असे अटक आरोपींची नावे आहेत. या तिघांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, साखळी चोरी आणि खासकरून पाणी मीटर चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुशंघाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी एक पथक स्थापन केले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ विटकर पोलीस हवालदार सचिन भालेराव, योगेश डोंगरे, विनोद कांबळे, राकेश पाटील पोलीस नाईक अमितकुमार तडवी, पोलीस शिपाई किरण बुधवंत, निलेश निकम शंकर भांगरे, राहुल डोंबाळे यांचा समावेश करण्यात आला. सदर पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही पाहणी करीत तपास केला असता त्यात घरफोडी गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटली. सदर आरोपीस सापळा रचून बोनकोडे गावात अटक करण्यात आली. शाहीद अर्शद शेख असे त्याचे नाव असून साखळी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याच्याकडून चार तोळे तीन ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या आरोपी विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चार घरोफोडी गुन्ह्यांची नोंद आहे. 

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

हेही वाचा – किरकोळीत कांद्याची दुप्पट दराने विक्री

तसेच साखळी चोरी व एका मेडिकल दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी तपास केला असता  सरूद्दीन ताजुद्दीन शेख हा आरोपी निष्पन्न झाला. या आरोपीलाही मुंब्रामधील अमृतनगर येथे सापळा  रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून साखळी चोरी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि  घरफोडी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा – एक पोस्टकार्ड मणिपूरसाठी, महिला भगिनींसाठी; नवी मुंबईकरांची राष्ट्रपतींना हाक

गेल्या काही महिन्यांपासून कोपरखैरणे आणि घणसोली परिसरात पाणी मीटर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना प्रमोद मोहन कुमार याचे नाव समोर आले. याच्या बाबत चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या खैरणे गावातील घरी गेले. त्यावेळी त्याच्याकडे अनेक पाणी मीटर व त्याचे सुटे भाग आढळून आले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने घरफोडी केलेल्या गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर घरफोडी व पाणी मीटर चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.