नवी मुंबई : शुक्रवारी पहाटे कोपरखैरणे सेक्टर २० येथील जनित्रात तांत्रिक बिघाड झाला . त्यामुळे सेक्टर१७,१८,१९ सी येथे वीज पुरवठा खंडित झाला.पहाटे ५ च्या सुमारास सेक्टर२० येथील जनित्रात बिघाड होऊन आग लागली होती. आग फार मोठी नव्हती ती काही वेळात विझलीही मात्र त्या मुळे तीन ते चार सेक्टर मधील वीज पुरवठा खंडित झाला.दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले मात्र सुट्या भागांची नेहमी प्रमाणे वानवा असल्याचे एका कामगाराने सांगितले.या बाबत अभियंता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार फॉल्ट छोटा असला तरी दुरुस्ती वेळ लागेल. किती वेळ लागेल हे या स्टेपला सांगू शकणार नाही असेही त्यांनी माहिती दिली. घणसोली गावठाण आणि लगतच्या काही भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र पावणेदहाला सुरळीत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहाटे विद्युत पुरवठा खंडित झाल्यांचा सर्वाधिक मनस्ताप महिला वर्गाला झाला.मुलांची शाळा, पती पत्नीचा डबा हे करत असताना विद्युत उपकरणेच बंद पडले. गिझर मिक्सर, इस्त्री फ्रीज सर्वच बंद असल्याने तारांबळ उडते असा अनुभव सेक्टर१९ मधील रहिवासी स्वाती देशमुख यांनी सांगितला.