पनवेल: पनवेल तालुक्यात आतापर्यंत एकच कुटूंबाकडे कुणबी मराठा अशी नोंद आढळली आहे. हे कुटूंब करंजाडे येथे राहणारे असून या कुटूंबाचा गाव नमुणा १४ वर ही नोंद आढळल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल तालुक्याची लोकवस्ती सूमारे १२ लाखांवर पोहचली आहे. तालुक्यामध्ये सर्वाधिक इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) नागरिकांचे वास्तव्य आहे. हिंदु मराठा यांचे वास्तव्य असले तरी हिंदु मराठा या खुल्या प्रवर्गातील कुटूंबप्रमुख सध्या आपले सोयरे कुणबी कोण आहेत याच्या शोधात आहेत. खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला शासनाने २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने अजून काही दिवस हे सर्वेक्षण सूरु असणार आहे. तालुक्यात ६५ ते ७० टक्के भाग ही शहरी असून शहरी भागात पनवेल महापालिका प्रशासनाने खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी ७०० कर्मचारी आणि ४० पर्यवेक्षक नेमले. तसेच ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी प्रांताधिका-यांनी ५०० कर्मचारी नेमले. पनवेल महापालिकेने शहरीभागात आतापर्यंत १,३८,७३८ एवढ्या कुटूंबाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. उर्वरीत सर्वेक्षणासाठी पालिकेने ज्या कुटूंबियांचे सर्वेक्षण झाले नसेल अशांनी पालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पालिका क्षेत्रातील अनेक गृहनिर्माण सोसायटीने सर्वेक्षणाला परवानगी दिली नसल्याने या सोसायट्यांमध्ये पुन्हा सर्वेक्षण केले जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित सोसायटी सचिव व अध्यक्षांची असणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली.

हेही वाचा >>>पनवेल : शांतिवन संस्थेच्या विश्वस्त मिरा लाड यांचे निधन

सर्वेक्षणासाठी शासनाने दिलेल्या अॅपनूसार ग्रामीण भागात कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. नागरिकांनी खरी आणि विनाविलंब माहिती द्यावी. गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी सरकारी कर्मचा-यांना सर्वेक्षणासाठी गेल्यावर प्रवेशव्दारावरुन आत शिरु न देण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्वेक्षणाला सर्वांनीच सहकार्य करावे.   – राहुल मुंडके, प्रांताधिकारी, पनवेल

माझे सोयरीक कुणबी मराठा यांच्यासोबत असल्याने त्यांच्या दाखल्यांच्या आधारे मला कुणबी मराठा प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मी अर्ज दाखल लवकरच करणार आहे. पनवेलमध्ये कुणबी मराठा कमी आहे हे मान्य असले तरी मराठा बांधवांनी सर्वेक्षणासाठी आल्यास तातडीने माहिती भरुन द्यावी. जास्तीत जास्त कुणबी नातेवाईक असल्यास त्यांचे संबंध जुळवून प्रमाणपत्र काढून घ्यावे.- विनोद साबळे, समन्वयक, मराठा समाज

नागरिकांनी अचुक माहिती द्यावे तसेच खुल्या प्रवर्गासाठी होत असलेल्या सर्वेक्षणाला सहकार्य करावे. –गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunbi maratha single family records in panvel amy
Show comments