उष्म्याच्या तडाख्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रबाळे, घणसोली, कोपरखरणे येथे ऐन नवरात्रोत्सवात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री-बेरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे गृहिणींना व व्यापाऱ्यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यास गेले असता तिथे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे अनुभवही येत आहेत. याबाबत महावितरणची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता उपअभियंता एस. एस. महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा