-नवी मुंबई शहरातील आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे शहरातले बेकायदा पार्किंग .२१ व्या शतकातील सुनियोजित शहर म्हणजे नवी मुंबई.परंतू महाराष्ट्र सरकारने ७०च्या दशकात सिडकोची निर्मिती करत नियोजनबद्ध शहराची निर्मिती केलेल्या देखण्या नवी मुंबई शहरात विविध भौतिक व नागरी सुविधांच्या नियोजनाची पोलखोल होऊ लागली आहे.नवी मुंबई शहराला सध्या अत्यंत भेडसावणारी समस्या म्हणजे पार्किगची समस्या. नियोजनबद्ध शहरात बेकायदा पार्किंगचे अपुऱ्या व तोकड्या जागेअभावी व प्रशासकीय आस्थापनांच्या योग्य सुनियोजनाअभावी शहरातील पार्किंगचा पूर्ण बट्ट्याबोळ झालाआहे. त्यामुळे दिवसेंदिवस पार्किंगची समस्या मोठे व्यापक रुप घेत असल्याचे सर्वच उपनगरात पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नवी मुंबईत स्वच्छतेबाबतची मरगळ संपता संपेना…; निर्माल्य कलश भरले; उचलणार कधी ?

दुसरीकडे दिवसेदिवस वाहनांची संख्या वाढत असताना पालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यात फक्त ५६ वाहनतळे दाखवली आहेत. विशेष म्हणजे काही विभागात शून्य वाहनतळ असल्याचे चित्र आहे.तर शहरभर बेकायदा पार्किंग पाहायला मिळत आहे.त्यामुळे पालिकेची स्मार्ट पार्किंग पॉलीसी अद्याप कागदावरच असून फक्त बेलापूर येथील बहुमजली पार्किंगचे काम फक्त सुरु आहे.अन्यथा पार्किंगला ५६ वाहनतळ आहेत तर दुसरीकडे वाहने झाली उदंड असे चित्र सर्वत्र शहरात आहे.

शहराच्या नियोजनबद्ध वसवलेल्या शहराला बेकायदा पार्किंगच्या बकालपणाचे विद्रुप दर्शन दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात जिकडे बघावे तिकडे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी असा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे.त्यामुळे नवी मुंबई शहरात घराबाहेर पडण्यापूर्वीपासूनच योग्य पार्किंग सुविधेअभावी गाडी रस्त्यावर पार्क करायला लागणार की काय याचा विचार वाहनचालकाला सतावत आहे.शहरात वाढलेली वाहनांची संख्या व रस्त्यांच्या दुतर्फा होत असलेले बेकायदा पार्किंगमुळे कोणी पार्किंग करायला जागा देता का जागा अशी म्हणण्याची वेळ नवी मुंबईकरांवर आल्याचे पाहायला मिळत आहे.संपूर्ण राज्यात स्वच्छतेत पहिला तर देशात तिसरा क्रमांक व राहण्यास योग्य असणाऱ्या देशभरातली विविध शहरांमध्ये नवी मुंबईचा आजही वरचा क्रमांक लागत असताना या शहराच्या सध्याच्या व भविष्यातील पार्किंगची सुविधा ही शहरासाठीचे मोठे आव्हान आहे.एकीकडे राहण्यासाठी शहराला पसंदी मिळत असताना दुसरीकडे याच शहरातील राहणीमान उंचावत असून वाहनांची संख्याही वाढत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नाल्यातील काळ्या पाण्यामुळे पिरवाडी किनारा काळवंडला

एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना शहराच्या प्रत्येक उपनगरातील मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यावरही दुतर्फा पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला आहे.वाशी,नेरुळ,सीवूड्स,कोपरखैरणे,ऐरोलीसह विविध उपनगरात वाहतूककोंडीत भर पडत आहे. रस्त्यावरील बेकायदा पार्किंगमुळे रहदारीसाठी अपुरी जागा शिल्लक राहात असल्यामुळे काही मिनीटांच्या प्रवासासाठी याच शहरात काही तास लागत असल्याचे वास्तव पुढे येऊन लागले आहे.नियोजनबद्ध शहराची निर्मिती केलेल्या सिडकोने व या शहराचा भौतिक व नागरी सुविधांचा पालनहार असलेल्या नवी मुंबई महापालिकेने महापालिकेच्या निर्मितीनंतर फक्त महाराष्ट्रात ,देशात नव्हे तर संपूर्ण जगभराचे कौतुक मिळवून देणाऱ्या गोष्टींची व विविध प्रयोगशील उपक्रमाची निर्मिती करुन शहराला वेगळा आयाम प्राप्त करुन दिला.पण याच शहरात सिडको व महापालिकेसमोर पार्किंगच्या समस्येचा महामेरु समोर उभा ठाकला आहे.सिडकोने शहराची निर्मिती केल्यानंतर शहरासाठी विविध नागरी व भौतिक सुविधांच्यासाठी भूखंड हस्तांतरण करण्याचा लालफितीतला खेळ अद्याप सुरुच आहे.शहराची निर्मिती करताना महामार्गाच्या पारसिक रांगाकडील भाग हा औद्योगिक वसाहतींसाठी तर महामार्गाच्या दुसरीकडील भाग हा नागरी वस्तीसाठी निश्चित केला गेला आणी तशीच नवी मुंबई आकारास आली.पण याच शहरात नागरी वस्तीत व औद्योगिक वसाहतीमध्येही सर्वच रस्त्यावर बेकायदा पार्किंगचा प्रश्न सर्वात बिकट झाला आहे.शहरात पार्किंग व्यवस्थेचे शास्त्रोक्त सर्वेक्षण आयआयटी मुंबई या नामांकीत संस्थेकडून करण्यात येत असले तरी पार्किंगची समस्या हे शहरापुढील मोठे आव्हान येत्या काळात अधिकच गडद होणार आहे हे निश्चित.

शहर वाढलं आणि शहरात मॉल संस्कृती रुजली.शहरातील आरोग्यसुविधा देणारी रुग्णालये,टोलेजंग हॉटेल्स,रेल्वेस्थानके ,चित्रपटगृहे,बाजारपेठा अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणाच्या भोवती पार्किंगचा फास अधिक घट्ट होऊ लागला आहे.पार्किंगच्याबाबत विविध प्रशासकीय संस्था, राजकारणी, समाजकारणी, लोकप्रतिनिधी व मायबाप सरकारची धोरणे ही तुटपूंजी ठरत आहेत.नवी मुंबई महापालिकेने पार्किंगच्या बाबत काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला परंतू हा प्रयत्न कितपत पुरणार आहे याचाही विचार करण्याची लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणांना गरज आहे.नवी मुंबई महापालिकेने २०१० नंतर नवीन बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र पार्किंगच्या व्यवस्थेबाबत नियमावली राबवली परंतू अनेक ठिकाणी या सर्व नियमांना फाटा मिळत आहे.

हेही वाचा- नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंतचा जल्लोष; नवी मुंबईतील हॉटेल, बार, पब व्यावसायिक तयारी सुरु

दुसरीकडे या शहरातील दाटीवाटीने व हवीतशी पसरलेली मूळ गावठाणे ,बेकायदा झोपपट्ट्या,अनधिकृत बांधकामे यांच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे शहराचा विचका होऊ लागला असून पालिकेने या समस्येसाठी वाशी सारख्या ठिकाणी सुरु केलेले नाल्यावरील पार्किंग,पार्किंगसाठीच्या बहुमजली इमारतींच्या निर्मितीची सुरवात ,उद्यानाखालील पार्किंगचे धोरण हे अमलात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करायला हवा. दुसरीकडे सिडकोकडून महापालिकेला हायटेन्शनखालील सर्वच जागा या पालिकेकडे हस्तांतरीत करुन त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा व सुविधा उपलब्ध करुन दिले पाहीजे.नवी शहराचे आयुक्त यांनीही पार्किंग ही शहरातील मोठी समस्या नजरेपुढे ठेऊन पार्किंग बाबत ठोस उपाययोजना करायला सुरवात केली असल्यामुळे थोडीसी खुशी व थोडीसी आशा नागरिकांच्या मनात निर्माण झाली असून या समस्येवर दिर्घकालिन उपाययोजना व्हायलाच हवी अशी मागणी व आशा शहरातील नागरीक सरकारकडून करत आहे.

त्यामुळे एकीकडे शहरात पार्किंगचा जटील प्रश्न निर्माण झाला असताना मॉल संस्कृतीमुळे शहरातील झगमगाट पाहायला मिळत असताना दुसरीकडे याच मोठ्या आस्थापनांच्या नकारघंटेमुळे व नियमाची चाफ दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेअभावी पार्किंगचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र आहे.याच पार्किंगच्या समस्येमुळे शहरात हळूहळू कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला असून त्याचे उग्ररुप काही कालावधीतच योग्य धोरणे राबविली नाहीत तर पाहायला मिळतील अशी भिती नवी मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. वाशीतील ट्रक टर्मिनसच्या जागेत गृहनिर्मिती प्रकल्पाचा घाट घातला आहे.त्यामुळे शहरात पार्किंग ही सर्वात मोठी समस्या ठरणार आह असल्याचे मत नागरीक व्यक्त करु लागले आहेत.

महापालिका सिडकोकडून उच्चविद्युतदाबाखालील जवळजवळ १५० भूखंड हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.परंतू अद्याप काही याला पूर्ण यश आले नाही. नवी मुंबई शहरात पार्किंगची समस्या आहेच.शहरात प्रभागनिहाय वाहनतळांची सुविधा आहे.पण अनेक भागात वाहनतळे नाहीत. शहरातील स्मार्ट पार्किंग पॉलिसीबाबत शहर अभियंता विभागाकडून आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती .परिमंडळ १ उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली

हेही वाचा- मासळीच्या कचऱ्यातून मत्स्य खाद्य निर्मिती; प्रायोगिक तत्वार दिवाळे बाजारात मासळीच्या कचऱ्यावर प्रक्रिया

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने स्मार्ट पार्किंग पॉलिसीच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. शहर अभियंता विभागाकडून पार्किंगबाबत आराखडा बनवण्यात येत आहे.शहरात बहुमजली पार्किंगबाबतही सुविधा निर्माण केली जात आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगबाबत ठोस नियोजन करण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती शहर अभियंत संजय देसाई यांनी दिली

पालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यातील माहितीनुसार शहरातील वाहनतळांची संख्या विभागाप्रमाणे…..

बेलापूर- ९ वाहनतळ

नेरुळ- ११

सानपाडा-४

वाशी- २४

कोपरखैरणे- ०

घणसोली- ०

ऐरोली-८

शहरातील एकूण वाहनतळे- ५६