पनवेलमधील भाजीविक्रेते गेल्या 30 वर्षांपासून मुख्य बाजारपेठेत अंगारक संकष्टचतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. शेकडो लहानमोठे भाजी, फळ आणि फुल विक्रेते त्यांचा व्यवसाय झाल्यावर नित्य भक्तीभावाने या गणेशाची आराधना करतात. गेल्या अनेक वर्षांपासून लालबागचा राजाच्या मूर्तीप्रमाणे या गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने येथे सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांची रांग लागते.
ज्या पनवेलमधील गणेशभक्तांना मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेता येत नाही असे भाविक महात्मा ज्योतिबा फुले फेरीवाला संघटनेने आणलेल्या गणेशमुर्तीचे दर्शन घेत असल्याची माहिती या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी मंगळवारी सांगीतले.