रबाळे एमआयडीसी मधील एका बेब डिझायनिंग कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही पगारवाढीवरून कंपनी मालकांशी वाद घातले होते.
रबाळे एमआयडीसी मध्ये खालिद अब्दुल वाहिद यांनी चार महिन्यापूर्वी साँफ्ट वेअर डेव्हलपिंगची कंपनी सुरु केली आहे. सुरवात असल्याने सदर कंपनीत आठ ते दहा कर्मचारी काम करीत आहेत. त्यात आसिफ आणि हसन हे दोघे वेब डिझायनिंगचे काम पाहतात. त्यांनी काम सुरु केल्यावर काही महिन्यातच पगारवाढीची मागणी केली. मात्र कामाच्या दर्जा प्रमाणे पगार दिला जाईल असे अब्दुल यांनी त्या दोघांना सांगितले. ११ आणि १२ जानेवारी दरम्यान घरगुती कार्यक्रम आणि काही अन्य काम असल्याने अब्दुल हे कंपनीत येऊ शकले नाहीत.
हेही वाचा >>> नवी मुंबईत दर महिन्याला ७७ वाहनांची चोरी; गुन्हे रोखण्यात पोलीस हतबल
१३ तारखेला दुपारी ते कंपनीत आले. त्यावेळी दोन लॅपटॉप कमी होते. कंपनीच्या सर्व लॅपटॉप मध्ये विविध ग्राहकांची गोपनीय माहिती असल्याने ते चोरी जाणे धोक्याचे होते. लँपटाँप बाबत अब्दुल यांनी व्यवस्थापक आतिष यांना विचारणा केली असिफ व हसन हे लॅपटॉप घेऊन जाताना त्यांनी पहिले व त्यांना हटकले असता तू अपना काम देख असे सांगून निघून गेल्याचे अतिष यांनी अब्दुल यांना सांगितले. त्यामुळे अब्दुल यांनी या बाबत रबाळे पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.