मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात समितीत सध्या सफरचंद, डाळींब आणि सीताफळ या फळांचा हंगाम सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अंजीर फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते,मात्र सततच्या पावसाने आगापच्या उत्पादनाला फटका बसला असल्याने अंजीर हंगामाला १५ दिवसांनी सुरुवात होईल. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून आवक होत असून सध्या बाजारात अवघी एक गाडी दाखल होत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त
मागील वर्षी ऑक्टोबर अखेर- नोव्हेंबर सुरुवाती पासूनच १४ क्विंटलपर्यंत अंजीर बाजारात दाखल झाले होते. यंदा मात्र एकच गाडी दाखल होत आहे. अवकाळी पावसाने सुरुवातीच्या छाटणीला आलेल्या अंजीरला फटका बसला आहे. फळ परिपक्व होण्यास उशीर झाला आहे आणि त्यामुळे बाजारात अल्प प्रमाणात आवक होत असल्याचे मत घाऊक फळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसांत वातावरणात उष्ण दमट बदल होत होते. मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच कडक उन्हाळा.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर तरी १०० शिक्षक मिळणार का ? शिक्षकांचा तुटवडा संपणार कधी !
अंजीर फळाला थंड वातावरणात अधिक भर येत असतो. आता दोन दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. या फळ उत्पादनाला जास्त प्रमाणात पाण्याची आवशकता ही असते परंतु सततच्या पावसाचा मारा झाल्याने अतिरिक्त पाणी झाले होते. परिणामी अंजीर खराब झाले आहे. अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. त्यामुळे बाजारात अल्प प्रमाणात दाखल झाले आहे. नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत अंजिरचे हंगाम असून १० नोव्हेंबरनंतर अंजिरची आवक वाढण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात एक गाडी दाखल होत असून ४० नगाला ३००रु ते ४५०रु बाजारभाव आहे.