खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. रेल्वेच्यावतीने या १४ किलोमीटर मार्गावर अखंड २६० मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम शनिवारी उरण स्थानकातून करण्यात आले.
हेही वाचा- प्रदर्शन विक्री केंद्राच्या माध्यमातून महापालिकेचे महिलांना आर्थिक पाठबळ
नवी मुंबईतील नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग सध्या उलवे नोड मधील खारकोपर पर्यंत सुरू आहे. तर या मार्गावरील खारकोपर ते उरण मार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करून ही सेवा जानेवारी २०२३ पासून कार्यान्वित करण्याचे आदेश दिल्लीवरून आले आहेत. त्यामुळे जासई येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी बंद केलेले काम पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू केलेआहे. या रेल्वेचे जुने ट्रॅक बदलून त्याजागी अखंड २६० मीटर लांबीचे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे.