लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण: एमआयडीसीच्या रानसई धरणाच्या जलवाहिनीला मंगळवारी सकाळी चिर्ले ते जासई दरम्यान गळती लागली. त्यामुळे मंगळवार पासून रद्द करण्यात येणारी पाणी कपात होऊ शकली नाही. मात्र जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती एमआयडीसी कडून देण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील बहुतांशी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या घटलेल्या पाणी साठ्यामुळे जानेवारी महिन्या पासूनच आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार अशी दोन दिवसांची पाणी कपात करण्यात आली आहे. मात्र उशिरा का होईना पावसाने जोरदार हजेरी लावण्याने रानसई धरण ४१ टक्के भरले आहे. त्यामुळे रानसईतून करण्यात येणारी पाणी कपात मंगळवार पासून रद्द करण्याचा निर्णय एमआयडीसी ने घेतला होता. त्याचदिवशी सकाळी ही गळती लागल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. परंतु गळती दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leak in the water line of ransai dam mrj
Show comments