उरण : तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील एमआयडीसीच्या जलवाहिनीला गुरुवारी रात्री १० वाजता गळती लागली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले.
रानसई धरणाच्या लगत असलेल्या चिर्ले गावानजीकच्या जलवाहिनीला रात्री गळती लागली. यामुळे पंधरा ते वीस फूट उंचीची कारंजी निर्माण झाली होती. या घटनेनंतर एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी धरणातील पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. रानसई धरणाच्या जलवाहिनीला गळती लागली होती, त्याची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.