पनवेल : कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १५ मधील हंसध्वनी इमारतीमधील अनेक घरांना गळती लागली आहे. या गळती विषयींच्या तक्रारी निवारणासाठी ही इमारत बांधणा-या शिर्के कंपनीकडून गळती रोखण्यासाठी कर्मचारी वर्ग नेमला आहे. मात्र शिर्के कंपनीच्या प्रकल्प अधिका-यांकडे बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी गळती रहिवाशांच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. सिडको महामंडळाने १२९ कोटी रुपये खर्च करुन कळंबोली येथे हंसध्वनी महा गृहनिर्माण प्रकल्पातून ११ इमारतीचे संकुल उभारले. यामध्ये ९७२ सदनिका आहेत.
हेही वाचा >>> मुंबईसह-उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दोन वर्षांपूर्वी सोडतीमधील लाभार्थींना तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिकांचा ताबा देण्यात आला. ताबा दिल्यापासून पाच वर्षे या संकुलाच्या बांधकामविषयीच्या दुरुस्तीची जबाबदारी शिर्के कंपनीकडे आहे. मात्र सध्या या संकुलातील रहिवाशांना स्लॅबमधून पाणी गळती होणे, भिंती ओलसर राहणे अशा तक्रारींचा सामना करावा लागतो. नूकतेच या गुहसंकुलातील रहिवाशांना गृहनिर्माण संस्थेत या इमारतीची नोंदणी केली. सिडको मंडळाकडून अद्याप हस्तांतरण प्रक्रीया सूरु आहे. नवीन बांधकाम केलेल्या भिंतीतून गळती होत असल्यास बांधकामाच्या दर्जाविषयी चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> १४ गाव नवी मुंबईत समाविष्टची अंतिम अधिसूचना लवकरच निघणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
शिर्के कंपनीचे प्रकल्प अधिकारी जीवन कापसे हे रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी येथे काम करतात. अधिकारी कापसे यांनी दिलेल्या माहितीनूसार अनेक सदनिका भाड्याने दिल्याने स्वता येथे पाण्याची टाकी बसविणे, शौचालयात नवीन शौचभांडे बसविणे, बांधकामात काही बदल करायचे किंवा टाईल्सच्या फरशी बसविणे अशा विविध कामांसाठी सदनिकांचे मालक स्वता उभे राहून काम करुन घेत नाहीत. ठेकेदारावर काम सोपवून सदनिका अंतर्गत कामे केली जात असल्याने बांधकामाच्या मूळ आराखड्याला धक्का पोहचतो. तसचे पाण्याचे नळ अनेकदा खुले करुन सदनिकाधारक घराबाहेर जात असल्याने गळती होत असते. तरीही सिडकोच्या माध्यमातून शिर्के कंपनीच्या कर्मचा-यांचे एक पथक येथे सदैव तैनात असून सदनिकाधारकांच्या तक्रारीनंतर तातडीने कामाची पाहणी करुन त्यावर तोडगा काढला जातो. रहिवाशांनी स्वताच्या सदनिकेविषयी सर्तक रहाणे गरजेचे असल्याचे शिर्के कंपनीचे अधिकारी कापसे यांनी सांगितले.