उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढले होते , त्यामुळे किरकोळ बाजारात ही उच्चांक गाठला होता. आता पुन्हा लिंबाच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला असून महाराष्ट्रातील लिंबाचे आवाक २० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आधी ५०रु ते ६०रु प्रतिकिलोने उपलब्ध असलेले लिंबू आता ७० ते८०रु वधारले आहेत. तर किरकोळ बाजारात प्रतिनग ५ ते १०रुपयांवर पोहचले आहे.
हेही वाचा >>> महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल
उन्हाळ्यात उष्णता चांगलीच वाढली होती, त्यात यंदा उत्पादन कमी होते, त्यामुळे मागणी वाढल्याने लिंबांच्या दरात वाढ झाली होती. आता पावसाळ्यात पुन्हा लिंबाचे दर कडाडले आहेत. एपीएमसीत महाराष्ट्र , कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लिंबू दाखल होतो. महाराष्ट्रातुन लिंबाची आवक अधिक होते. परंतु लिंबाच्या उत्पादनालाही पावसाचा फटका बसलेला आहे, परिणामी राज्यातून २० ते २५ टक्के आवक कमी झाली आहे. आधी बाजारात राज्यातील आवक ६० ते ७० टक्के होती .मात्र आता ५०% होत आहे . आवक कमी झाली असून आधी ७० टन ते ८०टन दाखल होणारे लिंबू आता ५०टन ते ६०टन होत आहे.
हेही वाचा >>> महागाई व बेरोजगारी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उरण तहसील कार्यालयावर मोर्चा ; रेशनिंग व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी
दिवाळी पर्यंत दर चढेच राहणार
दिवाळीनंतर बाजारात राज्यातील लिंबाची आवक वाढेल. त्यावेळी नवीन उत्पादन दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे दिवाळीनंतर दर आटोक्यात येतील. दिवाळी पर्यंत लिंबाचे दर चढेच राहणार अशी माहिती एपीएमसी व्यापारी चंद्रकांत महामूळकर यांनी दिली आहे.