नवी मुंबई परिवहनचे पनवेल महापालिकेला पत्र

एनएमएमटी तोटय़ात असताना गेली काही वर्षे हद्दीबाहेरील ज्येष्ठ व अपंगांना प्रस्तावात नसतानाही तिकीट दरात दिली जात असलेली सवलत १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्यानंतर पनवेल महापालिका हद्दीतील सवलतीबाबत पेच निर्माण झाला आहे. यामुळे नवी मुंबई परिवहन प्रशासनाने पनवेल महापालिकेला पत्र पाठविले असून तुमच्या हद्दीतील नागरिकांना सवलत हवी असल्याने प्रतिपूर्ती करा असे कळविले आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
guide on how and when to use government vehicles by peoples representatives in Pune
लाल दिव्याची गाडी आणि नैतिकता
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व अपंगांना तिकिटात ७५ टक्के सवलत होती. परंतु सप्टेंबर २०१७ मध्ये ५० टक्के  सवलत देण्याचा प्रस्ताव आणला. त्यामध्येही पालिका क्षेत्रातीलच अपंगांना मोफत व ज्येष्ठांना ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१८ पासून करण्यात आली. परंतु यातही पालिका क्षेत्राबाहेरील ज्येष्ठ व अपंगांना सवलत देण्याचा नियम नसताना ती दिली जात होती. पालिका आयुक्तांनी याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. एनएमएमटी प्रशासनाने केलेल्या या चुकीमुळे कोटय़वधींचा तोटा परिवहन उपक्रमाला बसला आहे. हे पालिका आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी १ स्पटेंबरपासून ही सवलत बंद केली आहे.

एनएमएमटीच्या ४५० बसगाडय़ा मुंबई, कल्याण, डोंबिवली, उरण, पनवेल, भिवंडी, बदलापूर अशा पालिका क्षेत्राबाहेरील भागात धावतात. यात नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेकडे परिवहन सेवा नसल्याने नवी मुंबई महापलिकेच्या परिवहन सेवा तेथे सेवा देत आहे. पनवेल पालिका हद्दीतून येणाऱ्या ज्येष्ठ व अपंगांना याचा फटका बसला आहे. पनवेल महापालिकेने त्यांच्या हद्दीतील प्रवाशांच्या सोयी व सवलतीसाठी नवी मुंबई महापालिकेकडे काही महिन्यांपूर्वीच विचारणा केली असल्याचे एनएमएमटीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या सवलीतीचे काय करायचे हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई परिवहन प्रशासनाने पनवेल महापालिकेला पत्र पाठवून प्रतिपूर्ती केली तर ही सेवा पूर्ववत करू असे कळविले आहे. पनवेल महापालिका नवी मुंबई महापालिकेच्या प्रतिपूर्तीबाबत काय निर्णय घेते याकडे  प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाने पनवेल महापालिकेला तुमच्या हद्दीतील प्रवाशांच्या तिकीट दरातील सवलतींबाबत प्रतिपूर्ती करावी असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे याबाबत ते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

– डॉ. रामास्वामी एन. आयुक्त नवी मुंबई महापालिका

प्रतिपूर्ती करण्याबाबतचे पत्र पाठवले आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्याबाबत नवी मुंबई महापालिकेला कळविले जाईल.

– गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका