लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल: पनवेल तालुक्यामधील क्रेझी बॉईज या बारचा परवाना पोलीस आयुक्तांनी रद्द करण्याची कार्यवाही केली आहे. मागील अनेक वर्षानंतर अशाप्रकारची कठोर कार्यवाहीचे सत्र पुन्हा पोलीस दलात सुरु झाले आहे.

ऑर्केस्ट्रा बार आणि लेडीज सर्व्हीसबारच्या परवान्याखाली पनवेलमध्ये लेडीज डान्सबार चालवले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या काळात या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेल्याने मध्यरात्री व पहाटेपर्यंत लेडीज सर्व्हीस बार सूरु ठेवले जात होते. मात्र पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी डिसेंबर महिन्यापासून पदभार स्वीकारल्यापासून बार आस्थापना चालकांना कायद्याच्या कक्षेत राहूनच व्यवसाय करण्यासाठी नियमांची पकड नियंत्रणात ठेवण्याची तयारी सुरु झाली. अचानक लेडीज सर्व्हीस आणि ऑर्केस्ट्रा बारवर धाडींचे सत्र आयुक्त भारंबे यांच्याकाळात सुरु झाले.

आणखी वाचा-तळोजातील भुयारी मार्गात हिवाळ्यातही पाणी साचले

स्थानिक पोलीस टाळाटाळ करत असल्याचे ध्यानात आल्यावर नवी मुंबई क्राईम ब्रँच आणि अन्य पोलीसांच्या पथकांना अचानक तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. २६ ऑगस्ट या रात्री केलेल्या अचानक तपासणीमध्ये पनवेल येथील क्रेझी बॉईज या ऑर्केस्ट्रा बारमध्ये परवान्यासाठी नेमूण दिलेल्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा अहवाल तपासणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. वारंवार नियम उल्लंघन करणाऱ्या क्रेझी बॉईज हॉटेल व्यवस्थापनाविरोधात स्थानिक पोलीस व पोलीस उपायुक्तांनी सुद्धा या बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पोलीस आयुक्त भारंबे यांनी यावर सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये ३० ऑक्टोबरपासून क्रेझी बॉईज या बारचा परवाना रद्द झाल्याची माहिती आयुक्त भारंबे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: License of crazy boys bar cancelled in panvel mrj
Show comments