उरण : रेल्वे स्थानकात चढ-उतार करण्यासाठी उद्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र उद्वाहन सुरू नसल्याने जेष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल सुरू आहेत. उरण ते नेरुळ / बेलापूर या लोकल मार्गावरील लिफ्ट सुरू होण्याची प्रवाशांना गेल्या अकरा महिन्यांपासून प्रतीक्षा आहे.
१२ जानेवारीला उरण ते नेरुळ/ बेलापूर दरम्यानची लोकल सुरू झाली आहे. मात्र गेल्या अकरा महिन्यांपासून उरण परिसरातील उरण, द्रोणागिरी,न्हावा शेवा व शेमटीखार या चारही स्थानकातील उद्वाहने आतापर्यंत सुरू झालेली नाहीत. यातील उरण आणि द्रोणागिरी या दोन्ही स्थानकात भुयारी मार्गाने ये – जा करता येते, मात्र न्हावा शेवा व शेमटीखार या स्थानकांच्या फलाटांवर जाण्यासाठी ६५ पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागत आहेत. त्यामुळे या स्थानकांतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा…पालिकेच्या परिवहन उपक्रमात अपघातांच्या संख्येत मात्र घट
गेल्या वर्षभरापासून येथील प्रवाशांना उद्वाहन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. मी ज्येष्ठ नागरिक असून नवी मुंबईत जाण्यासाठी येथील स्थानकातून प्रवास करीत आहे. मात्र या स्थानकातील लिफ्ट गेल्या सुरूच झालेली नसल्याची माहिती नंदकुमार पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी पी.डी. पाटील यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो असे सांगितल