उरण : शुक्रवारी सकाळी ११ साडे अकरा वाजता उरण मधील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे प्रचंड उष्म्यात काही कालावधीत वातावरणात मातीचा सुगंध पसरला होता. या बदलेल्या वातावरणामुळे तात्पुरते समाधान मिळालं मात्र काही क्षणातच पुन्हा एकदा उकाड्याला सुरुवात झाली आहे.
पावसाच्या आगमनाची चाहुल लागला आहे. त्यामुळे वातावरणात ही नैसर्गिक बदल दिसत आहेत. पक्षी अनेक प्रकारचे आवाज करू लागले आहेत. तर आकाशात काळे ढग दाटू लागले आहेत. उष्माने नागरीक हैराण झाले आहेत. त्यामुळे घामाच्या धारा ही वाहत आहेत. आशावेळी काही क्षणापूरता का होईना हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्या पासून दिलासा मिळाला.