शुक्रवारी पहाटे पासूनच उरण शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय,युईस व रोटरी स्कुलच्या बोरी मार्गावरील नाला दुथडीभरून वाहू लागल्याने रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्यातून विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे उरण कुंभारवाडा मार्गावरील दादर नाला ही भरून वाहू लागला असून या मार्गावरील मंगलमूर्ती वसाहत व एचडीएफसी समोर पाणी साचले आहे.

हेही वाचा >>> पनवेल : कामावरून घरी परतत असलेल्या महिलेचा स्थानकाजवळ खून

विना कठडा बोरी नाल्याचा धोका
उरण शहराला जोडणाऱ्या बोरी मार्गावर नाल्याला कठडा नसल्याने येथील नाला भरून वाहत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने या मार्गाने प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

Story img Loader