उरण : उदघाटनंतर पहिल्याच दिवशी शनिवारी उरण स्थानकाच्या फलाटावरील दिवे बंद असल्याने अंधार पसरला आहे. स्थानकांच्या परिसरातील पथदिवे आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरील तसेच स्थानकात उभ्या असणाऱ्या लोकलच्या दिव्यांच्या उजेडात प्रवाशांना ये जा करावी लागत आहे. उरण स्थानकाच्या फलाटावरील वीज लोकल सुरू होण्यापूर्वी ही अनेकदा बंद असायची.

१ हजार ३०० जणांचा प्रवास

शनिवारी पहिल्या दिवशीच उरण वरून बेलापूर व नेरुळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपारी ४ वाजेपर्यंत १ हजार ३०० पर्यंत होती. त्यामुळे उरणच्या रेल्वे स्थानकात दुचाकी ठेवण्यासाठी असलेले वाहनतळ भरले होते.सकाळी ६ वाजल्या पासूनच नव्याने सुरू झालेल्या उरण ते बेलापूर आणि नेरुळ मार्गाने उरणच्या शेकडो प्रवाशांनी केवळ या सेवेचा आनंद घेण्यासाठी प्रवेश केला. यात अनेकांनी आपल्या कुटुंबासह हा प्रवास केला. उरणचे मूळ नागरिक असलेले विपुल सरवय्या हे सध्या उलवे नोड मध्ये राहतात मात्र त्यांनी आपलं स्वतःच वाहन असतांनाही उरण ते खारकोपर दरम्यान लोकलनेच प्रवास करणे पसंत केले.

हेही वाचा >>>नवी मुंबई विमानतळासाठी आता मार्च २०२५ ची मुदत

त्यांनी उरणच्या लोकलमुळे यावेळी प्रदूषण आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करण्याची सोय झाल्याचे मत व्यक्त केले. तर न्हावा शेवा ते बेलापूर प्रवास करणारे मांगीलाल यांनी आपण वाहन चालक असून दररोज रस्ते मार्गाने अंधेरी ते उरण दोन ते अडीच तास प्रवास करायचो त्यासाठी ११० रुपये खर्च येत होता. मात्र आजपासून हा प्रवास ४० रुपयात आणि एक ते सव्वा तासात विना अडथळा पूर्ण करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Story img Loader