लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : येथील द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या बोकडविरा व शेवा या गावांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वीजेचे दिवे मंगळवारी दुपारी दिवसाही सुरू होते. याच पुलावर अनेकदा वारंवार ये जा करणारी वीज आणि अंधार याचा सामना या पुलावरून चारचाकी व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. तर पुलावरील खड्डे व विजेच्या लपंडावामुळे अपघातांची ही शक्यता वाढली आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

आणखी वाचा-अवैधरित्या भारतात प्रवेश करून राहत होते दाम्पत्य, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई…

उरण मध्ये विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोडला जोडणारे रेल्वे उड्डाणपूल सिडकोकडून उभारण्यात आले आहेत. या पुलाची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र याकडे सिडको विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. उरण- नेरूळ रेल्वेच्या मार्गावरील हा उड्डाणपूल असून उरण शहरात ये जा करण्यासाठी असलेला. बोकडविरा ते उरण चारफाटा हा मार्ग नेरूळ ते उरण रेल्वे मार्गामुळे बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.

Story img Loader