नवी मुंबईतील वाशीतील ‘स्मार्ट थॉट्स डे केअर सेंटर’ या पाळणाघरातील १६ महिन्यांच्या बाळाला थोबाडीत मारून उचलून बाजूला ढकलल्याचा  क्रूर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीसमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही फुटेजनुसार चिमुकला खुर्चीवर बसला आहे, तेवढ्यात टेबलावर त्याच्यासमोर खायचे ताट ठेवले जाते आणि बाळ त्या ताटातील चमचा घ्यायल जातो, पण त्याचवेळी त्याच्या थोबाडीत बसते आणि त्याला उचलून बाजूला केले जाते. हे बाळ रडत राहते. घरी आल्यावरदेखील बाळाचे रडणे थांबत नसल्याने सीसीटीव्ही तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला. दोन आठवड्यापासून हे बाळ रात्री झोपत नाही. सतत रडत असल्याने या बाळाला असेच मारले जात असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Delhi triple murder case update
तक्रारदार मुलगाच निघाला आई-वडील, बहिणीचा खुनी; संपत्तीसाठी २० वर्षीय मुलाचं धक्कादायक कृत्य
two youths drowned pune
पुणे : पवना धरणात दोन तरुण बुडाले

हेही वाचा – नवी मुंबई : सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकामाला पालिकेचे अभय ?

हेही वाचा – नवी मुंबई : १७ व्या डी.वाय. पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, १६ संघांचा सहभाग

पोलिसांनी या प्रकरणी फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला असल्याने या पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्हीदेखील तपासता आले नाहीत. पाळणाघर चालकाने पालकांनी तक्रार केल्यावर सीसीटीव्हीची मोबाईल लिंक बंद करण्यात आली. यामुळे याप्रकरणी एफआयआर दाखल झाली असती तर या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीअंती अजून काही बाबी समोर आल्या असत्या, अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे. याबाबत तपास सुरू आहे, एवढीच माहिती वाशी पोलिसांनी दिली.

Story img Loader