ठाणे शहर दूध व्यवसायिक कल्याणकारी संस्थेनकडून शायकीय निमशायकीय तथा खासगी सहकारी दुग्धाशाळांकडुन वेळोवेळी एकतर्फी दुधाच्या दरात वाढी विरोधात मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याबाबत मागणी केली आहे. वारणा आणि गोकुळ दूध डेरी संघ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- उरण: सिडकोला एक इंच ही जमीन न देण्याचा निर्णय; शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिक एकवटले
दूध विक्रेत्यांना विक्रीच्या दरावर किमान १० टक्केप्रमाणे कमिशन वाढ देण्याचे निर्देश त्वरीत द्यावेत व त्याकरीता आवश्यक ती उपाय योजना त्वरीत करावी. अन्यथा दुग्धशाळेच्या दुधविक्रीवर बेमुदत बहिष्कार ठाकण्यात येईल असा इर्शारा यावेळी देण्यात आलेला आहे. यावेळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल येथील दूध विक्रेते सदस्य उपस्थित होते.
दरवेळी एकतर्फी दुधाच्या विक्री दरात वाढ केली जाते. गेल्या ७ वर्षात प्रति लिटर २०रुपये आवाजवी दरवाढ करण्यात आली आहे. त्याचा बोजा जनसामन्यांवर लादण्यात आला आहे. मात्र दुध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वर्षानुवर्ष वाढ करण्यात आलेली नाही. या दूध विक्रेत्यांनी या मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशनमध्ये व्यवसाय करणे अशक्य झाले असून पाणी, लाईट बिल, पेट्रोल खर्च, मुलांचे पगार, सायकल खर्च, दुकान भाडे इ. चार पटीने वाढले आहे. त्यामुळे आमचे विक्रेते कर्ज बाजारी झाले आहेत. या परिस्थीतीत व्यवसाय करीत राहिलो तर आमच्यावर उपासमारीची बेघर होण्याची परीस्थिती उदभवेल, परिणामी स्वरूप शेतकऱ्यांसारखी आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा- राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
दुग्धाशाळांकडुन वेळोवेळी एकतर्फी दुधाच्या दरात वाढी विरोधात आम्ही दूध डेरी यांच्यावर मोर्चा काढला होता. यावेळी वारणा आणि गोकुळ दूध डेरी संघांना निववेदन देऊन विक्रीच्या दरावर १० टक्के कमिशन द्यावे . येत्या ८-१०दिवसांत हा निर्णय घेण्यात आला नाही तर दुग्धशाळेच्या दुधविक्रीवर बेमुदत बहिष्कार ठाकण्यात येईल, असा इशारा ठाणे शहर दुध व्यवसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिला.