कामोठेतील शेकाप पदाधिकारी भाजपच्या वाटेवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्य़ातील शेकापचे बुरुज ढासळू लागले असून पनवेल मतदारसंघातील कामोठे ग्रामपंचायतीतील शेकापचे ४० पदाधिकारी आणि दोन विद्यमान नगरसेविकांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शेकापला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.

शेकापमधील आणखी काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.  मागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाखापेक्षा जास्त मतदान पदरात पाडून घेणाऱ्या शेकापमधील ही फूट लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पार्थ पवार यांनाही त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

महामुंबई क्षेत्रातील पनवेल, उरण आणि कर्जत मतदार संघाचा भाग असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी सरळ लढत आहे. हा लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा गेली दहा वर्षे असून दोन्ही खासदार शिवसेनेचे होते. यंदा या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अशी सरळ लढत होणार आहे. ही लढत सर्वस्वी शेकापच्या मतदारावर अवलंबून असून मागील निवडणुकीत येथील शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी अडीच लाखापेक्षा जास्त मते घेऊन बारणे यांना टक्कर दिली होती. जगताप हे तसे पुणे जिल्ह्य़ातील पण केवळ पनवेल उरण भागात असलेले शेकापच्या पारंपरिक मतदारांच्या बळावर ते अडीच लाख मते मि़ळवू शकले होते. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर हे तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले होते. त्याच राष्ट्रवादीचे पवार केवळ शेकापच्या पाठिंब्यावर ह्य़ा निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरलेले असताना शेकापच्या या बालेकिल्ल्याला पनवेल विधानसभा मतदार संघातील कामाठे गावात खिंडार पडले आहे. येथील शेकापच्या नगरसेविका सुशीला भगत व हेमलता गोवारी यांचे पती अनुक्रमे भाऊ भगत व रवि गोवारी हे भाजपचे कमळ हातात घेऊन प्रचार करण्यास तयार झाले आहेत. त्यांच्यासोबत याच गावातील चाळीस शेकाप कार्यकर्ते भाजपचे येथील सर्वेसर्वा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेला आहे. या गावातील जुने भाजप कार्यकर्ते व नव्याने आलेले  शेकापचे कार्यकर्ते यात मनोमीलन करण्याचे कामही ठाकूर यांनी पेढे भरवून केले आहे. शेकापच्या नगरसेविका पद रद्द होण्याच्या भीतीने कुंपणावर उभ्या असून नवीन पनवेल व उलवा येथील आणखी दोन मातब्बर स्थानिक कार्यकर्ते भाजपात जाण्यास इच्छुक आहेत. याचा फटका शेकापच्या बळावर मैदानात उतरलेल्या पार्थ पवार यांना बसणार असून ही गळती रोखण्यासाठी शेकापचे माजी आमदार व नेते विवेक पाटील मैदानात उतरणर आहेत. पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे या रणधुमाळीपासून काही काळासाठी दूर आहेत, पण ते लवकरच या निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्याची शक्यता आहे.

सिडकोचे संचालकपद देण्याचे आश्वासन?

राजकारणाचे फासे बदलले की माणसाचे आरोप-प्रत्यारोपदेखील बदलतात. शेकापच्या ताब्यात असलेल्या कामोठे ग्रामपंचायतीवर येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी तोफ डागली होती. या ग्रामपंचायतीत कोटय़वधीचा भ्रष्टाचार असल्याची तक्रार त्यांनी ग्रामविकास विभागाकडे लेखी दिली होती. आता ते भ्रष्टाचारी ग्रामपंचायत भाजपच्या आश्रयाला आल्याने त्यातील आरोप हवेत विरघळून जाणार आहेत. भाजपमधील या इनकमिंगच्या बदल्यात काही जणांना सिडकोचे संचालकपददेखील देण्याचे आश्वासन दिले जात आहे.