दहावी-बारावीच्या अभ्यासाची तंत्रे, विद्याशाखेच्या निवडीचे निकष आणि करिअरचे विविध पर्याय यांविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी उद्या, शनिवार, १२ डिसेंबर रोजी सायं. पाच वाजता वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात नवी मुंबईकरांना मिळणार आहे. हा परिसंवाद सर्वासाठी खुला आहे.
एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने या परिसंवादाचे आयोजन वाशीच्या सेक्टर ६ येथील मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करिअर समुपदेशक विवेक वेलणकर दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख करून देणार आहेत. त्यानंतर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांचे ‘वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..’ या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात माटुंग्याच्या व्हीजेटीआय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक (निवृत्त) सुरेश नाखरे श्रोत्यांना अभियांत्रिकी शाखेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादाच्या अखेरीस ‘दहावी-बारावी परीक्षेच्या येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा?’ याविषयी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधतील.

कधी ? – शनिवार, १२ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता
* कुठे? मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाचे सभागृह, सेक्टर ६, वाशी.

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती

मार्गदर्शक व त्यांचे विषय –
* वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता,  केईएम रुग्णालय.
* अभियांत्रिकी शाखेतील संधी- प्रा. सुरेश नाखरे, प्राध्यापक (निवृत्त), व्हीजेटीआय महाविद्यालय, माटुंगा.
* दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख- विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक.
* परीक्षेच्या तणावाचा सामना कसा कराल?- डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ.

Story img Loader