दहावी-बारावीच्या अभ्यासाची तंत्रे, विद्याशाखेच्या निवडीचे निकष आणि करिअरचे विविध पर्याय यांविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी उद्या, शनिवार, १२ डिसेंबर रोजी सायं. पाच वाजता वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात नवी मुंबईकरांना मिळणार आहे. हा परिसंवाद सर्वासाठी खुला आहे.
एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने या परिसंवादाचे आयोजन वाशीच्या सेक्टर ६ येथील मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करिअर समुपदेशक विवेक वेलणकर दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख करून देणार आहेत. त्यानंतर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांचे ‘वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..’ या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात माटुंग्याच्या व्हीजेटीआय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक (निवृत्त) सुरेश नाखरे श्रोत्यांना अभियांत्रिकी शाखेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादाच्या अखेरीस ‘दहावी-बारावी परीक्षेच्या येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा?’ याविषयी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा