नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई मंडळाची शाळा सुरू केली आहे . शाळा सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. यंदा २४०जागांसाठी ९५९ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रवेशप्रक्रिया आद्यप सुरू झाली नसून लॉटरी कधी काढली जाणार याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी ४ मे ही लॉटरी काढण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात लाकडी पेट्या, गवत; आग लागण्याच्या घटनेची पुनरावृत्तीची शक्यता
नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरूळ सेक्टर ५० याठिकाणी पालिकेची सीबीएसई मंडळाची शाळा उभारली आहे. खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे शिक्षण आपल्या मुलांना देणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना करीता सीबीएसई शाळा सुरू करून पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या शाळांना प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी प्रवेश घेण्यासाठी २५मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दोन्ही शाळांत १,११५अर्ज दाखल झाले आहेत. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये ६७३ अर्ज दाखल झाले असून ५२१ पात्र ठरले आहेत तर सीवूडस शाळा क्रमांक ९३मध्ये ४४२ अर्ज प्राप्त झाले असून ४१४अर्ज पात्र ठरले असून यापैकी २४० जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये वयोगटात न बसल्याने आणि शाळे जवळच्या परिघाचा विचार करता उर्वरित अर्ज बाद झाले आहेत. अखेर ४ मे ला ही लॉटरी काढण्यात येणार असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.