गणेश भक्तांना मुंबईतील गणरायाच्या दर्शनासाठी तसेच बेलापूर ते पनवेल ब्लॉक यादरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल- दादर आणि पनवेल ते बेलापूर मार्गावर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (एनएमएमटीने) विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दररोज ५०% प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे त्या मार्गवर एनएमएमटीचे उत्पन्न देखील कमी झाले आहे. मुंबईमध्ये ही नामांकित तसेच आकर्षक देखावे पाहण्यासाठी विविध ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. पनवेल, नवी मुंबई ,ठाणे याठिकाणाहुन मुंबईत अधिका अधिक श्रीगणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात दिवसासह रात्रीही मुंबई गजबजलेली पाहायला मिळते. विशेषतः नोकदार वर्ग सर्व कामकाज आटपून रात्रीच्या वेळी गणरायाच्या दर्शनासाठी धाव घेत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा