नवी मुंबई शहर झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढत असताना येथील जागांचे व घरांचे दर करोडोंच्यापटीत गेले आहे. नवी मुंबई शहरात झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढणाऱ्या सीवूड्स रेल्वेस्थानक परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भव्य मॉल व स्थानकाच्या दोन्ही बाजूला एल अन्ड टी कंपनीच्यावतीने सुरु असलेल्या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे या परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे गृहनिर्मिती प्रकल्प आकारास येत असून रात्रंदिवस या ठिकाणी बांधकाम सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांनी पालिका व पोलीस विभागाला दिल्या आहेत. तर दुसरीकडे य ठिकाणी बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट मिक्सर रस्त्यावरच उभे असल्याने नागरिकांनी चालायचे तरी कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे. या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे या परिस्थितीतील नागरिकांना मात्र अनेक नागरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकल्पाला दिवसरात्र कामाची परवानगी दिली असून आजुबाजूच्या सामान्य नागरीकांना पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जाण्याचीही भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा