नवी मुंबई : हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून इतर फळांच्या हंगामाला सुरुवात होत आहे. बाजारात आता लिचीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिनाअखेरपर्यंत हापूसचा हंगाम संपतो. त्यानंतर बाजारात पावसाळी फळांचा हंगाम सुरू होतो. मे महिन्यात बाजारात लिची दाखल होण्यास सुरुवात होत असते. सध्या बाजारात १५००-१६०० पेट्या दाखल होत असून दोन दिवसांत आवक वाढून तीन हजार पेटी आवक होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सध्या बाजारात पश्चिम बंगालमधून लिची दाखल होत आहे. लिची ही उष्ण वातावरणात लवकर खराब होते. उष्ण वातावरणाने लिचीच्या सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे लिचीचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. लिची ट्रकने बाजारात येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी जातो, त्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणून या फळांच्या वाहतूककरिता रेल्वे आणि हवाई वाहतुकीचा वापर केला जातो. रेल्वे सेवेने विलंब होत असल्याने सध्या केवळ हवाई वाहतूक केली जात आहे. त्यामुळे यंदा दर चढेच आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात सध्या लिची प्रति किलो २५०-३०० रुपयांनी विक्री होत आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!

हेही वाचा… Maharashtra Live News : घाटकोपर होर्डिंगप्रकरणातील जबाबदार भावेश भिंडे बेपत्ता, फोनही स्वीच ऑफ

एपीएमसी बाजारात लिची दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उष्ण वातावरणाने सुरुवातीच्या लिचीच्या हंगामाला फटका बसला आहे. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात ७० टक्के उत्पादन खराब झाले. बाजारात आता हंगाम सुरू झाला असून चांगल्या प्रतीची लिची दाखल होत आहे.- हरेश वसंतदानी, घाऊक व्यापारी, एपीएमसी