नवी मुंबई शहरात महाराष्ट्र भूषण डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : अखेर ‘त्या’ वादग्रस्त अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई
बैठक व निरुपणाचा माध्यमातून उत्तम समाज घडविणाऱ्या डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर सहभाग असतो, त्याच सामाजिक भावनेतून प्रतिष्ठानने हे स्वच्छता अभियान राबविले आहे अशी माहिती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली आहे. श्री सदस्यांकडून स्वच्छतेची साधने, झाडू हातात घेऊन शहरात सफाई करण्यात सुरुवात केली. हजारो संख्येने श्री सदस्यांनी यात सहभाग घेतला होता.