वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून स्टॉल धारकांनी एक दिवसा एक दिवसाने हे प्रदर्शन वाढवण्यात यावे अशी मागणी केल्यामुळे रविवारी संपणार हे प्रदर्शन आता एक दिवसांनी वाढवून सोमवारी संध्याकाळी संपणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासन महालक्ष्मी प्रदर्शन व्यवस्थापक यांनी लोकसत्ताला दिली.
८ मार्च डिसेंबर ते १९ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी मुंबईत बांद्रा येथे होणारे हे प्रदर्शन नवी मुंबईत पहिल्यांदाच भरविण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा कल वाढत असून शनिवारी व रविवारी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून या प्रदर्शनाची मुदत आज रविवार १९ मार्चपर्यंत होती.या या प्रदर्शनाला आतापर्यंत दाखल नागरिकांनी भेट दिली असून वाढत्या प्रतिसादामुळे महालक्ष्मी एका दिवसाने वाढवण्यात आल्याची माहिती महालक्ष्मी सरस ,राज्य अभियान व्यवस्थापक कुमार खेडकर यांनी लोकसत्ताला दिली.
हेही वाचा >>> नवी मुंबई : शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा एप्रिल अखेरीस कार्यान्वित होणारच- आयुक्त नार्वेकरांचा निर्धार
उमेद अभियानाअंतर्गत महिला बचतगटाच्या महिलांना त्यांच्या परिश्रमाला , व्यवसायाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक व्यवयसायिक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचा खरीदार वर्ग वाढविण्यासाठी गेले १७ ते १८ वर्षांपासून हे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साडया, ज्युटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, लेदरच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बुट, ड्रेस मटेरीयल, साडी, बेडशीट, कारपेट, पडदे तसेच घरगुती मसाले, पापड, कुरडई, इत्यादी वस्तू आणि जेवणाच्या मेजवानीचे स्टॉल उपलब्ध आहेत. प्रदर्शनामध्ये ५५० स्टॉल असून यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण १५० स्टॉल आहेत.
प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल आहेत. या आधी हे प्रदर्शन बिकेसी येथे भरविण्यात येत होते. मात्र पहिल्यांदाच नवी मुंबई मध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील काही स्टॉलधारकांनी यावर्षी ५० ते ७५ टक्के विक्री झाल्याचे सोनाली जाधव या स्टॉल धारक यांनी सांगितले. तर दुसरीकडे काही स्टॉल धारकांनी नवी मुंबईपेक्षा मुंबईमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला जास्त चांगला प्रतिसाद असल्याचे मत व्यक्त केले.
महालक्ष्मी प्रदर्शनातून ८९ मोठ्या ऑर्डर्स महिलांना मिळाल्या
शनिवारी रात्री पर्यंत ५ करोड १८ लाख रुपयांची विक्री झाली. तर काल रात्रीपर्यंत ३ लाख ६ हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. आत्तापर्यंत या प्रदर्शनातून ८९ मोठ्या ऑर्डर्स महिलांना मिळाल्या आहेत.
नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद
शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी नागरिकांच्या भेटी वाढत आहेत, शनिवारी आणि रविवारी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून रविवारी संपणारे हे प्रदर्शन एक दिवसाने वाढण्यात आले आहे.