नवी मुंबई: खारघर येथे महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार वितरणाचा महासोहळा आयोजित करण्यात आला होता. लाखो श्री सदस्यांच्या साक्षीने खारघर वसाहतीमधील सेक्टर २९ येथील कार्पोरेट पार्क येथील ३०६ एकर मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येत असून सदर कार्यक्रमाची तयारी आठ दिवसापासून सुरू होती. मात्र त्यात राज्यात करोना रुग्ण संख्येत होणारी वाढ पाहता सदर कार्यक्रमात मुखपट्टी अनिवार्य केली होती. या ठिकाणी १८ लाख श्री सदस्य येतील अशी शक्यता होती प्रत्यक्षात त्याही पेक्षा अधिक आले आहेत . एवढी गर्दी अपेक्षित असल्याने मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात फार क्वचित उपस्थितांनी मुखपट्टी घातलेली होती.
First published on: 16-04-2023 at 14:08 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bhushan award ceremony good arrangement but in corona situation people did not wearing mask mrj