नवी मुंबई: आज दुपारी संपन्न होणाऱ्या जेष्ट निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या श्री सदस्यांनी रणरणत्या उन्हा पासून संरक्षण म्हणून पावसाळी छत्रीची साथ मिळाली. शुक्रवार पासून काही सदस्य या ठिकाणी तंबू टाकून राहिलेले आहेत विशेष म्हणजे यात काही लहानग्यांचीही हजेरी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुपारी बारा वाजता येण्याची शक्यता असून दीड वाजेपर्यंत कार्यक्रम संपणार आहे. तोपर्यंत काही श्री सदस्यांनी आणलेली छत्री आधार ठरणार आहे आजचे तापमान ३६ सेल्सिअस आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- नवी मुंबई: हेलिकॉपर मधून श्री सदस्यांवर पुष्पवृष्टी

महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा

जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घडी समीप आली असून प्रचंड श्री सदस्य समुदाय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच वेळी पारंपरिक ढोल पथक ही तयार असून यात महिला युवती प्रमुख आकर्षण आहे. तुर्रेदार मजबूत बांधणीचे फेटे, नऊ वारी साड्या पायात जोडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bhushan award ceremony shri members were excited in the scorching heat mrj