नवी मुंबई : जनतेचा आपल्यावर असणारा विश्वास अधिक दृढ करून आगामी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा हीच खरी बाळासाहेबांना जयंतीच्या निमित्ताने समर्पित केलेली आदरांजली असेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा यांच्यावतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना दस्तावेज वाटप, दिनदर्शिका प्रकाशन आणि पक्ष प्रवेश आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी मंत्री केसरकर यांनी संवाद साधला.
हेही वाचा >>> उरण : मच्छिमारांमुळे जखमी फ्लेमिंगोला मिळालं जीवदान, पतंगाच्या मांज्याने दुखापत झाल्याची शंका
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगार बरोबरच विविध प्रकल्प व विकास कामांची गंगा अवतरली आहे. मागील २२ वर्षापासून घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या अखंडित पाठपुरामुळे मार्गी लागला आहे. नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असा आशावाद मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती उपस्थिती त्यांना दिली तर आगामी कालावधीत नवी मुंबईकरांच्या समस्या देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. उपस्थितशी संवाद साधताना किशोर पाटकर यांनी २२ वर्षापासून नाकर्ते राज्यकर्त्यांच्यामुळे नवी मुंबईतील सिडको निर्मित कराचा प्रश्न रखडला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल त्यांचे आभार मानले. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मिळालेले घर हीच खरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केले असल्याचे म्हणाले.