मुंबई : दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्तीचा जागर’ या संकल्पनेवरील चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे. राज्यात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या संकल्पनेवरील चित्ररथाची निवड झाली आहे.
विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?
यंदाची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांनी तयार केली आहेत. ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे प्रतिकृतींचे काम सांभाळत आहेत.