पनवेल : बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सिडको मंडळाच्या बामनडोंगरी येथील २०२२ साली सिडको मंडळाच्या घरांच्या किमती राज्य सरकारने ६ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने ४,८६९ अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री या योजनेतील लाभार्थ्यांसाठी कोणता निर्णय घेतात याकडे सदनिकाधारकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लाभार्थी अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या लाभासह सुमारे २७ लाख रुपयांत घरे मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ मधील बामणडोंगरी (उलवे) येथील ४८६९ सदनिकांसाठी १७ फेब्रुवारी २०२३ ला सोडत काढण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांना काही दिवसात सदनिकांचा ताबा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सोडतीची योजना पार पडल्यानंतर सदनिकांची किंमती कमी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा…वातावरणातील वाढत्या गारव्याने मासळी गारठली

सदनिकाधारकांचे हित ध्यानात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सदनिकांच्या किमती ६ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोला घेण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे मूळ ३५ लाख ३० हजार रुपये किमतीची सदनिका २९ लाख ५० हजारांना लाभार्थींना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांच्या अनुदानामुळे लाभार्थी अर्जदारांना ही सदनिका केवळ २७ लाखांमध्ये मिळणार आहे.

सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ मधील बामणडोंगरी, उलवे येथील घरासाठी ३५ लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती कमी करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यामुळे किमती सहा लाखांनी कमी झाल्या आहेत. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हेही वाचा…बातमी खास हापूस आंबा खवय्यांसाठी, जानेवारीत हापूसची विक्रमी आवक मात्र एप्रिलमध्ये पडेल तुटवडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी- २०२२ मधील बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किमती रु. ६ लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सदर योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होईल. – अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको